Tap to Read ➤

बाबरवर फिदा आहे ही अभिनेत्री, त्याला कुणी ट्रोल केलं की, तिला येतो राग

या सुंदरीनं व्यक्त केलं पाकिस्तानी क्रिकेटर बाबर आझमवरील प्रेम
पाकिस्तानचा स्टार बॅटर बाबर आझम सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीत आहे. त्याची पाकिस्तानमध्ये तुफान क्रेझ असल्याचेही पाहायला मिळते.
पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटरच्या चाहत्यांच्या यादीत पाकमधील उदयोन्मुख अभिनेत्री दुवा जहरा हिचाही समावेश आहे.
पाकमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अन् अभिनेत्रीच्या रुपात ओळख निर्माण करत असलेल्या दुवानं एका मुलाखतीत पाकिस्तानच्या स्टार बॅटरबद्दलच्या मनातील भावना व्यक्त केल्या.
बाबर आझम हा एकमेव माझा क्रश आहे, असे तिने एका मुलाखतीत सांगितले. तिचे हे वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे.
बाबर आझमशिवाय अन्य कोणताही क्रिकेट आवडत नाही, असेही ती यावेळी म्हणाली आहे.
बऱ्याचदा बाबर आझम हा सोशल मीडियावर ट्रोलही झाल्याचे पाहायला मिळते. याबद्दलही अभिनेत्री व्यक्त झाली.
लोकांनी त्याला ट्रोल केलेले मला अजिबात आवडत नाही.  या गोष्टीचा राग येतो, असेही बाबरवर फिदा असणारी अभिनेत्री म्हणाली आहे.
क्लिक करा