शरीरातलं दुसरं हृदय काेणतं?

मानवी शरीरात दाेन हृदय असतात, असं सांगितलं तर खरं वाटेल का? पण, शरीरात दुसरं हृदय कुठे असतं? 

आपल्या शरीरात खरं तर दुसरं हृदय सुद्धा आहे. हृदयप्रमाणेच हा अवयव ही शरीरात काम करत असताे. 

हे दुसरं हृदय म्हणजे आपल्या पायाचे स्नायू. यांना Calf Muscle Pump असं नाव दिलं गेलंय. 

जेव्हा आपण चालतो किंवा धावतो, पायातील स्नायू आकुंचन-प्रसरण करतात. त्यामुळे रक्त वर हृदयाकडे ढकललं जातं.

या प्रक्रियेमुळे रक्त खाली पायात साचत नाही. उलट प्रवाह (backflow) होऊ नये म्हणून शिरांमध्ये झडपा (valves) असतात.

यामुळेच पायांचे स्नायू रक्ताभिसरण सुधारतात. हृदयाला थेट मदत मिळते. म्हणूनच त्यांना म्हटलं जातं दुसरं हृदय. 

जर कोणी जास्त वेळ उभं राहिलं किंवा बसलं तर, रक्त पायात साचू लागतं. सूज येते, वेदना होतात.

पायाचे आराेग्य चांगले राहण्यासाठी, रक्ताभिसरण चांगले राहण्यासाठी चालणे, स्ट्रेचिंग, नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. 

खास करून लांब प्रवासात (flight/बस) पाय हलवणं गरजेचं असतं. अन्यथा ‘डीप व्हेन थ्रोम्बोसिस’सारखा आजार होऊ शकतो.

क्रीडा वैद्यक शास्त्रातही ‘Calf Muscle Pump’ ला फार महत्त्व दिलं जातं. खेळाडूंसाठी तर हे हृदयाचे साथीदार ठरतात.

Click Here