Tap to Read ➤
ऋतिक-दीपिकाचा इटलीमध्ये रोमान्स
दोघांचं रोमँटीक गाणंही होतंय शूट
अभिनेता ऋतिक रोशन सध्या 'फायटर' या आगामी चित्रपटाच्या कामात बिझी आहे. मागील काही दिवसांपासून तो याच चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.
'जवान'मध्ये पाहुण्या कलाकाराच्या रूपात आपली छाप सोडणारी दीपिका पदुकोण या चित्रपटात ऋतिकसोबत मुख्य भूमिकेत आहे.
या चित्रपटासाठी ऋतिक आणि दीपिका सध्या इटली मुक्कामी आहेत.
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या ॲक्शन थ्रिलर 'फायटर मध्ये ऋतिक आणि दीपिकाचं रोमँटिक साँगही असल्याचे समजते.
या गाण्यासह आणखी एक गाणं आणि चित्रपटातील इतर पॅचवर्कही इटलीतच केलं जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ऋतिक आणि दीपिका इटलीमध्ये १५ दिवसांचं शूटिंग शेड्यूल पूर्ण करण्यासाठी गेले आहेत.
२७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शूटिंग शेड्युलमध्ये दोन गाण्यांचा समावेश असेल.
यात फूट टॅपिंग 'घुंगरू...' गाणंही असेल असं समजतं. हे स्टायलिश सॉंग विशाल आणि शेखर यांनी संगीतबद्ध केलंय
क्लिक करा