Tap to Read ➤

"Paytm Fastag बदलणार आहात? वाचा पुढचे ऑप्शन काय आहेत

काही दिवसापूर्वी आरबीआयने पेटीएम बँकेवर कारवाई केली, यामुळे आता पेटीएम फास्टॅग वापरकर्तेही संभ्रमात पडले आहेत.
पेटीएम बँकेची सेवा वापरणाऱ्या अनेक लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
पेटीएम बँक वापरकर्त्यांना वॉलेट, फास्टॅग आणि मेट्रो कार्ड आणि एनसीएमसी कार्डच्या सेवा पुरवते. फास्टॅग ही एक इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे, ते नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल टॅक्स भरावा लागेल.
पेटीएम फास्टॅग बाबत तुम्हीही गोंधळलेले असाल तर आज आम्ही तुम्हाला पेटीएम फास्टॅग कसे परत करुन नवीन FASTag कसे घ्यायची याची माहिती घेऊ.
Paytm FASTag परत सुरू करण्यासाठी, तुम्हाला 1800-120-4210 वर कॉल करावा लागेल. यानंतर तुम्हाला फोनवरील सूचनांचे पालन करावे लागेल.
कॉल दरम्यान FASTag निवडण्याचा पर्याय असेल. त्यानंतर, कॉल दरम्यान FASTag कायमचे निष्क्रिय करण्याचा पर्याय असेल. ते निवडा आणि पुढे जा.
सर्व तपशील सबमिट केल्यानंतर, तुम्हाला FASTag बंद करण्याची सूचना मिळेल. यानंतर तुम्ही स्वतःसाठी नवीन FASTag खरेदी करू शकता.
तुम्ही नवीन फास्टॅग कोणत्याही बँकेतून मिळवू शकता. यामध्ये SBI, HDFC, ICICI आणि अनेक बँकांच्या नावांचा समावेश आहे.
FASTag ऑफलाइन खरेदी करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या शाखेत किंवा जवळच्या बँकेला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तेथे फास्टॅग खरेदी करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल.
पेटीएम फास्टॅग बाबत, पेटीएमने आधीच माहिती दिली आहे की, ही सेवा सुरू राहणार आहे. मात्र, ते कसे काम करणार याबाबत स्पष्ट माहिती नाही.
क्लिक करा