बरेच आठवडे लिंबू ताजतवानं कसं ठेवायचं यासाठी काही ट्रीक्स पाहुयात.
प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात आवर्जुन दिसणारा घटक म्हणजे लिंबू.
पदार्थाची चव वाढवणारं लिंबू शरीरासाठीही तितकंच गुणकारी आहे.
साधारणपणे लिंबू आपण फ्रीजमध्ये ठेवतो. परंतु, ठराविक काळानंतर ते वाळायला लागतं.
फ्रीजमध्ये ठेवलेलं लिंबू बऱ्याचदा वाळतं आणि त्यातील रस कमी होतो. यासाठी लिंबू कायम पिशवीत ठेऊन ती घट्ट बांधा मगच फ्रीजमध्ये ठेवा.
जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर लिंबू पाण्यात ठेवा. ही लिंब २ आठवडे छान राहतात.
लिंबू पेपर वा कापडात बांधून ठेवल्यास ते ताजे राहतात.
जर लिंबू अर्धे कापलेलं असेल तर त्यावर थोडं मीठ टाकावं आणि ते हवाबंद डब्यात ठेवावं. ज्यामुळे ते कोरडं पडत नाही.
काचेच्या बाटलीतदेखील लिंबाचा रस साठवता येतो. तसंच या रसाच्या आईस क्यूब्जही करता येतात.