मोठ्यांसोबतच लहान मुलांमध्येदेखील ही समस्या पाहायला मिळते.
केसगळती ही सर्वसामान्यपणे प्रत्येकाची समस्या आहे. परंतु, मोठ्यांसोबतच लहान मुलांमध्येदेखील ही समस्या पाहायला मिळते.
लहान मुलांच्या केसगळतीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. मात्र, वेळीच या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर मुलांना अकाली टक्कल पडण्याची शक्यता असते.
लहान मुलांचे केस अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे त्यांच्या केसांच्या विविध हेअर स्टाइल करु नका.
केसांवर वारंवार कंगवा फिरवू नका.
कोणेतही केमिकल्सयुक्त उत्पादने त्यांच्यावर ट्राय करु नका.
हेअरस्टाइल करतांना कधीही मशीन वापरु नका.
आठवड्यातून एकदा केसांना कोमट तेल लावून मसाज करा.