पिरिअड्सचे डाग हे प्रचंड गडद असतात. त्यामुळे हे डाग सहजासहजी निघत नाही.
अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात हेवी फ्लो होतो. ज्यामुळे अनेकदा पिरिअड्सचे डाग त्यांच्या कपड्यांनाही लागतात.
पिरिअड्सचे डाग हे प्रचंड गडद असतात. त्यामुळे हे डाग सहजासहजी निघत नाही. किंवा, जरी हा डाग निघाला तरी सुद्धा त्यांची पुसटशी खूण कपड्यांवर राहतेच.
पिरिअड्सचा डाग जुना झाला असेल तर, डाग लागलेला भाग पाण्यात ३० मिनिटे भिजवून ठेवा.त्यानंतर बेकिंग सोडा, व्हिनेगर वा लिंबाचा रस यापैकी कोणत्याही एका लिक्विडने तो धुवून घ्या.
पिरिअड्सचे डाग काढण्यासाठी कायम गरम पाण्याचा वापर करा. गरम पाण्यातून एकदा कपडे धुवून घ्या. नंतर, गरम पाण्यातच साबण किंवा डिटर्जेंट पावडर टाकून त्यात कपडे भिजवून ठेवा.
पांढऱ्या कपड्यावर पिरिअड्सचा डाग असेल तर त्या ठिकाणी हायड्रोजन पॅरोक्साइड लावा. त्यानंतर ५ मिनिटांनी कपडे स्वच्छ धुवून घ्या.
जीन्सवर डाग पडले असतील तर व्हाइट व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घेऊन त्यात जीन्स भिजवा. १५ मिनिटानंतर जीन्स स्वच्छ धुवून घ्या.