तुमच्या कमाईवरचा TAX कमी कसा करावा? जाणून घ्या नवा फॉर्म्य
जाणून घ्या तुमचं झालेलं नुकसान तुमचा टॅक्स कशाप्रकारे वाचवू शकतं?
जर तुम्ही अलीकडेच शेअर बाजारात चांगला नफा कमावला असेल, तर ‘टॅक्स-लॉस हार्वेस्टिंग’चा वापर करून मागे झालेले नुकसान त्यातून वजा करून तुमच्यावरील कराचे ओझं कमी करू शकता. ही एक गुंतवणुकीचीच पद्धत आहे.
यात गुंतवणूकदार नुकसान झालेले शेअर्स किंवा इतर मालमत्ता विकून त्यांच्या कॅपिटल गेनवर लागणारा कर कमी करू शकतात.
यालाच ‘टॅक्स-लॉस सेलिंग’ असेही म्हटले जाते. यात गुंतवणूकदार वर्षाअखेरीस त्यांचा पोर्टफोलिओ तपासतात.
कोणत्याही गुंतवणुकीत नुकसान झाले असेल, तर त्यांना त्या मालमत्ता विकून ते नुकसान इतर फायदेशीर गुंतवणुकीच्या नफ्याविरूद्ध ॲडजस्ट करता येते. त्यामुळे एकूण कराचे ओझे कमी होते.
तुम्हाला यावर्षी बाजारातून १ लाख रुपयांचा कॅपिटल गेन झाला तर त्यावर १५% प्रमाणे १५ हजारांचा कर लागेल.
मात्र, तुमच्याकडे ६० हजारांचे नुकसानीतील शेअर्स आहेत परंतु, अजून ते विकलेले नाहीत. अशा स्थितीत हा ६० हजारांचा तोटा १ लाखांच्या नफ्यातून सेट-ऑफ केला जातो. त्यामुळे कर उर्वरित ४० हजार रुपयांवर लागतो.
टॅक्स-लॉस हार्वेस्टिंगमुळे ९ हजारांची बचत होते. विशेष म्हणजे हा तोटा पुढील ८ कर मूल्यांकन वर्षांपर्यंत कॅरी फॉरवर्ड करता येतो. कमी कामगिरी करणारे एसेट्स विकून अधिक चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली जाऊ शकते.