धान्यांमध्ये कीड लागू नये म्हणून करा ‘हे’ घरगुती उपाय

काही घरांमध्ये तांदूळ, गहू वा अन्य कडधान्य वर्षभरासाठी साठवून ठेवतात.

काही घरांमध्ये तांदूळ, गहू वा अन्य कडधान्य वर्षभरासाठी साठवून ठेवतात. परंतु, वातावरण बदलामुळे या धान्यांमध्ये कीड लागते. 

धान्यांना कीड लागू नये यासाठी काही उपाय पाहुयात. बहुगुणी कडुलिंबाच्या पानांचा वापर करुन आपण धान्याला लागणारी कीड थांबवू शकतो. 

कडुलिंबाची पाने वाळवून घ्यावीत. त्यानंतर ही पानं एका झिपलॉक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरावीत.या पिशवीला लहान छिद्र पाडावेत आणि ही पिशवी धान्याच्या गोण्यांमध्ये किंवा साठवणुकीच्या डब्यात ठेवावी. 

पिशवीला छिद्र पाडल्यामुळे कडुलिंबाच्या पानांचा वास धान्यांमध्ये दरवळतो, त्यामुळे या कडुलिंबाच्या तीव्र वासामुळे धान्यांना कीड लागत नाही.

लसूण हा उग्र वासाचा असल्यामुळे धान्यांना लागलेली कीड निघून जाते. 

१० ते १५ लसणाच्या पाकळ्या प्रत्येक धान्याच्या मधल्या लेअरमध्ये ठेवाव्यात. ज्यामुळे धान्याला कीड लागत नाही.

लाल मिरचीचा वापर करुनही धान्याला लागलेली कीड रोखता येते.

लाल मिरची धान्यामध्ये मिक्स करुन ठेवावी. यामुळे धान्याला लागणाऱ्या आळ्यांचा प्रादुर्भाव रोखला जातो.

'ही' चटणी खाल तर बॅड कोलेस्ट्रॉल होईल आपोआप कमी!

Click Here