Tap to Read ➤

चाळीशीनंतर मधुमेह टाळायचा असेल तर वाचा 'या' टिप्स!

चाळीशीनंतर मधुमेह आणि रक्तदाबाचा धोका अधिक असतो. तो दूर ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स!
सकाळी झोपून उठल्यावर पेलाभर कोमट पाणी प्या आणि मॉर्निंग वॉकला निघा. किमान २० मिनिटं चालून आल्याने भरपूर प्राणवायू मिळेल.
मॉर्निंग वॉक करून आल्यावर ५-५ मिनिटं किंवा वेळ असेल तर १५-१५ मिनिटं कपालभाती आणि अनुलोम-विलोम करा.
पुरेसा नाश्ता करा, पण झोप येईल एवढाही नाही! नाश्ता करत नसाल तर रात्रभर भिजवलेले चार बदाम आणि गायीच्या तुपात भिजवलेले दोन खजूर खा.
दुपारी बाराआधी जेवून घ्या. जेवणात सलाड किंवा कोशिंबिरीचा जास्तीत जास्त समावेश करा.
जेवून झाल्यावर वज्रासनात बसा. त्यामुळे पचनशक्ती सुधारेल.
दिवसभरात किमान एक ऋतुमानानुसार फळ खा. त्यामुळे सर्व पोषक तत्त्व शरीराला मिळेल.
किमान स्वतःचे कपडे खाली बसून धुण्याची सवय लावा. त्यामुळे पोटाचा व्यायाम होईल, ढेरी वाढणार नाही.
एकाच जागेवर एक तासापेक्षा जास्त वेळ बसू नका, अलार्म लावा, दहा मिनिटं स्ट्रेचिंग करा. त्यामुळे थकवा येत नाही आणि फ्रेश वाटतं.
घरी असाल तर दुपारी १५ मिनिटांची वामकुक्षी घ्या, ऑफिसमध्ये असाल तर बसल्याजागी १० मिनिटं ध्यानधारणा करा. मन शांत राहील.
अति गोड खाण्याची सवय वाईट, त्यामुळे अकाली वृद्धत्त्व येते, चेहेऱ्यावर सुरुकुत्या येतात, मेद वाढतो, वजन वाढते.
तुम्ही गोडखाऊ असाल तर दुपारी बाराच्या आधी गोड खाऊन घ्या व तासाभराने सलाड खा, त्यामुळे कॅलरीजचे योग्य विघटन होईल.
दिवसातून दोन वेळाच चहा प्या. अन्यथा शरीरात साखरेचे प्रमाण वाढून मधुमेह आणि रक्तदाबाची शक्यता वाढू शकते.
शक्य तेवढे ताजे अन्न खा, स्वच्छ राहा, नेहमी ताठ बसा, चालताना पोक काढू नका, त्यामुळे देहबोलीत फरक पडेल शिवाय आरोग्यही सुधारेल.
क्लिक करा