Tap to Read ➤
गव्हाच्या पिठाला जाळे लागू नये म्हणून सोप्या ८ टिप्स...
गव्हाचे पीठ व्यवस्थित स्टोअर करुन ठेवले नाही तर लगेच खराब होते, जाळी लागतात. पोरकीडे होतात. त्यासाठीच हे उपाय...
गव्हाचे पीठ खराब होऊ नये म्हणून ते स्टोअर करुन ठेवण्यासाठी अॅल्युमिनियम किंवा स्टीलच्या डब्यांत साठवून ठेवावे.
किटकांना पिठापासून दूर ठेवण्यासाठी, त्यात १ ते २ चमचे मीठ मिसळून घालावे. यामुळे पीठ महिनाभर ताजे ठेवू शकता.
किटक, अळ्यांपासून पिठाचे संरक्षण करण्यासाठी पिठाच्या डब्यांत ६ ते ७ तमालपत्र घालावेत.
एअर टाईट प्लास्टिकच्या पिशवीत पीठ भरुन ते फ्रिजमध्ये ठेवावे, फक्त त्यात ओलावा पोहोचू नये याची काळजी घ्यावी.
पीठ डब्यांत स्टोअर करुन ठेवण्यापूर्वी १ ते २ वेळा उन्हांत व्यवस्थित वाळवून घ्यावे. यामुळे पीठ दीर्घकाळ चांगले टिकून राहते.
गव्हाचे पीठ खराब होऊ नये म्हणून या पिठात ६ ते ७ सुक्या लाल मिरच्या घालून ठेवाव्यात.
गव्हाच्या पिठात ८ ते १० लवंगा घालाव्यात. लवंगांच्या वासामुळे पिठात अळ्या पडत नाहीत.
गव्हाचे पीठ खराब होऊ नये म्हणून यात कडूलिंबाची पानं घालून ठेवल्यास ते चांगले राहील.
क्लिक करा