Tap to Read ➤

चहापतीपासून बनवा होममेड स्क्रब, त्वचा होईल तजेलदार

काही घरगुती पद्धतींचा वापर केल्यास त्वचा तजेलदार होण्यास मदत होईल.
बदलत्या हवामानाचा आपल्या आरोग्यासह त्वचेवर परिणाम होतो. ज्यामुळे त्वचा कोरडी पडणे, मुरुमे येणे किंवा त्वचा निस्तेज होण्यासारख्या समस्या येतात.
आपण त्वचा अधिक सुंदर करण्यासाठी महागड्या उत्पादनांचा वापर करतो. यामुळे त्वचेच्या समस्या अधिक वाढतात.
काही घरगुती पद्धतींचा वापर केल्यास त्वचा तजेलदार होण्यास मदत होईल. त्यासाठी चहाच्या पानांपासून बॉडी स्क्रब बनवू शकतो.
आपली त्वचा तेलकट असेल तर चहाची पाने आणि तांदळाच्या पिठापासून बॉडी स्क्रब तयार करु शकतो.
बॉडी स्क्रब वापरण्यापूर्वी आपली त्वचा स्वच्छ करा. हे स्क्रब हाता-पायाला लावून मसाज करा. यामुळे मृत त्वचा निघण्यास मदत होईल.
आपली त्वचा कोरडी असेल तर स्क्रबमध्ये मध घालून त्वचेला लावा. मधामुळे त्वचेला ओलावा मिळेल.
जर आपली त्वचा अतिसंवेदनशील असेल तर कोणत्याही प्रकारची एलर्जी टाळण्यासाठी पॅच टेस्ट करा.
क्लिक करा