रेस्टॉरंटसारखे फ्रेंच फ्राइज करा आता घराच्या घरी, फॉलो करा या टीप्स

 परफेक्टपणे घरीच करा फ्रेंच फ्राइज

लहानांपासून मोठ्यांना आवडणारं स्नॅक्स म्हणजे फ्रेंच फ्राईज 

एकेकाळी ठराविक ठिकाणी मिळणारे फ्रेंच फ्राईज आता सगळीकडे सहज मिळतात.

दरवेळी मुलांना बाहेरच खायला देण्यापेक्षा ते घरीच करणं सोयीचं पडतं. म्हणूनच, बाहेर मिळणारे फ्रेंच फ्राइज परफेक्टपणे घरीच कसे करायचे ते पाहुयात.

योग्य आकारात बटाटे कापून त्यांना २-३ मिनिटे पाण्यात उकळवा. त्यानंतर एका नॅपकिन किंवा टिश्शूपेपरने ते स्वच्छ पुसून घ्या.

बटाटे कोरडे झाल्यानंतर त्याच्यावर कॉनफ्लॉवर टाकून हवाबंद डब्यात भरुन ते फ्रीजरमध्ये ठेवा.

फ्रीजरमध्ये हे बटाटे सेट झाल्यानंतर बाहेर काढून त्यावर चवीनुसार मीठ टाका आणि मग डीप फ्राय करा.

सुंदरी...सुंदरी...!

Click Here