चुकीच्या लाइफस्टाइलमुळे आजकाल अनेक जण अकाली मृत्युचे बळी पडत आहेत.
निरोगी आणि दीर्घायुषी होण्यासाठी कायमच आपल्याला पूर्वीच्या जुन्या माणसांची उदाहरणं दिली जातात.पूर्वीची माणसं दीर्घायुषी होती. त्या काळातील पिढी वयाच्या ९० ते ९५ वर्षापर्यंत सहज जीवन जगत होते.
सध्याच्या काळात आता हे चित्र बदललं आहे. चुकीच्या लाइफस्टाइलमुळे आजकाल अनेकजण अकाली मृत्युचे बळी पडत आहेत. यात ५ वर्षाच्या मुलापासून ते २० वर्षाच्या तरुणापर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचा समावेश आहे.
निरोगी आणि दीर्घायुषी व्हायचं असेल तर आपल्याला दैनंदिन जीवनात काही बेसिक नियम फॉलो केले पाहिजेत.
जर तुम्हाला दीर्षायुषी व्हायचं असेल तर वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. अतिरिक्त वजनामुळे मधुमेह, हायकोलेस्ट्रॉल, स्ट्रोक यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होतात.
वाईट सवयींपासून दूर राहिलात तर नक्कीच तुमचं आयुष्य निरोगी राहिल. त्यामुळे मद्यपान, धुम्रपान यांसारख्या वाईट सवयींपासून दूर रहा.
साखर, मीठ, एक्स्ट्रा फॅट्स यांसारखे पदार्थ आहारातून वर्ज्य करा किंवा अत्यंत कमी प्रमाणात खा. या पदार्थांमुळे अनेक शारीरिक व्याधी उद्भवतात.