Tap to Read ➤

५ टिप्स- म्हातारपणीही फुफ्फुसं राहतील ठणठणीत

फुफ्फुसांशी संबंधित कोणतेही आजार टाळायचे असतील तर काही गोष्टींची काळजी अगदी तरुणपणीची घ्या.. जेणेकरून वय वाढलं तरी फुफ्फुसांचा त्रास होणार नाही.
धुम्रपानाच्या सवयीमुळे फुफ्फुसं निकामी होण्याचे प्रमाण आपल्याकडे खूप आहे. त्यामुळे या व्यसनापासून लांब राहा.
फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी ॲरोबिक्स, रनिंग, जॉगिंग असे व्यायाम नियमितपणे करा.
नियमितपणे प्राणायाम किंवा श्वसनाचे व्यायाम केल्यामुळेही फुफ्फुसे चांगली राहण्यास मदत होते.
पुरेसे पाणी प्या. यामुळे शरीरातला कफ वाढत नाही. तो शरीराबाहेर निघून जाण्यास मदत होते.
स्वत:ची पुरेशी काळजी घ्या. संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावायला विसरू नका.
क्लिक करा