गजरा तब्बल ८ दिवस ताजातवाना ठेवण्यासाठी काही खास ट्रिक्स आणि टीप्स
कोणतंही शुभकार्य असलं की प्रत्येक स्त्रीच्या केसात गजरा हा दिसतोच दिसतो.
आपण देवीलादेखील गजरा, फुलांची वेणी अर्पण करत असतो. परंतु, एकदा वापरलेला गजरा संध्याकाळपर्यंत लगेच कोमेजून जातो.
गजरा तब्बल ८ दिवस ताजातवाना ठेवण्यासाठी काही खास ट्रिक्स आणि टीप्स आहेत.
Khandesh Zaika या सोशल मीडिया पेजवर एक व्हिडीओ पोस्ट करत या टीप्स त्यांनी शेअर केल्या आहेत.
गजरा तयार केल्यानंतर लगेच तो स्टीलच्या डब्यात ठेवा. हा डबा फ्रीजमध्ये ठेवून द्या.
गजरा तयार करण्यापूर्वी फुलांवर हलक्या हाताने पाणी मारा. ज्यामुळे फुलं लवकर वाळत नाहीत.
गजरा फ्रीजमधून काढल्यानंतर कधीही लगेच त्याला थेट सूर्यप्रकाशात नेऊ नका.