Tap to Read ➤

नकारात्मकतेशी लढण्याचे उपाय - श्री श्री रविशंकर

१० ऑक्टोबर रोजी 'मेंटल हेल्थ डे' आहे, त्यानिमित्ताने मनाच्या नकारात्मकतेला कसे हाताळायचे ते सांगताहेत श्री श्री रविशंकर!
नकारात्मक विचार येणे नैसर्गिक बाब आहे, परंतु त्याचा किती विचार करायचा आणि त्यातून बाहेर कसे पडायचे ते जाणून घेऊ.
मनुष्य बाहेर कितीही मुखवटे घेऊन वावरत असला तरी तो स्वतःला फसवू शकत नाही. मन शांत असेल तर मुखवट्यांची गरज लागणार नाही.
सतत सकारात्मक कोणीही राहू शकत नाही, 'सकारात्मक राहा' सांगणारे मोटिव्हेशनल स्पिकर्सदेखील नाही; म्हणून प्राप्त परिस्थिती स्वीकारा.
नकारात्मक विचार आले तर ते थोपवून न ठेवता त्यांना येउद्या. त्यांचा स्वीकार करणं ही या लढ्याची पहिली पायरी आहे.
आलेल्या कोणत्याही प्रसंगाशी लढण्याची क्षमता आपल्यात आहे हे कायम लक्षात ठेवा आणि मनावर बिंबवत राहा!
विचारांचा परीघ वाढवा! जेव्हा तुम्ही मोठ्या गोष्टींचा विचार करता तेव्हा तुम्हाला तुमचे प्रश्न आपोआप छोटे वाटू लागतील.
अति विचारांचं दडपणसुद्धा नकारात्मकतेला कारणीभूत ठरू शकतं! ज्या गोष्टी आपल्या आवाक्याच्या बाहेर आहेत त्याचा विचार सोडून द्या.
नकारात्मक विचार सावलीसारखे असतात, प्रकाशात जाताच सावली नाहीशी होते, तसेच सकारात्मक बाजू पाहिल्यास नकारात्मकता नष्ट होते.
लक्षात ठेवा, अपयश ही यशाची पायरी असते, अपयशाने खचून जाऊ नका.
जेव्हा तुम्ही उच्च ध्येय ठेवाल आणि ते मिळवण्यासाठी सतत व्यग्र राहाल, तेव्हा नकारात्मक विचारांना मनात जागाच उरणार नाही.
चाकोरीबद्ध जीवन जगू नका, नवनवीन आव्हानं स्वीकारा; साचेबद्धपणामुळेदेखील नैराश्य येते.
दुसऱ्या कोणाच्या वागण्याचा त्रास करून घेत स्वतःचा रागराग करून स्वतःलाच शिक्षा करून घेऊ नका.
प्रत्येक क्षणाचा संधीसारखा वापर करा, दर वेळी नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि आयुष्याकडे तटस्थपणे बघण्याची दृष्टी प्राप्त होईल!
क्लिक करा