उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतुमध्ये हमखास घरात दिसून येतात त्या म्हणजे लाल मुंग्या. दिसायला लहानशा असणाऱ्या या मुंग्या प्रचंड उपद्रव माजवतात.
एकदा का मुंग्यांनी घरात प्रवेश केला की मग तुमच्या किचनवर त्याच ताबा मिळवतात. अगदी गोडापासून तिखटापर्यंत सगळ्या पदार्थांपर्यंत त्या सहज पोहचतात. म्हणूनच, मुंग्यांना पळवून लावायच्या ट्रिक्स पाहुयात.
मुंग्यांना पळवून लावायचं असेल तर हळद आणि तुरटी पावडर समप्रमाणात मिक्स करा. आणि, मुंग्या असलेल्या ठिकाणी शिंपडा.
कोणत्याही एका पीठात मीठ मिक्स करुन मुंग्या असलेल्या ठिकाणी हे मिश्रण टाका. यामुळे सुद्धा मुंग्या पळून जातात.
मुंग्या घरात येऊच नयेत यासाठी त्या साधारणपणे कोणत्या ठिकाणी जास्त आढळतात त्या जागेवर प्रथमच मीठ टाकून ठेवा. म्हणजे मुंग्या येणारच नाहीत.
मुंग्यांना लसणाचा वास अजिबात आवडत नाही . म्हणून लसणाचा रस मुंग्या असलेल्या ठिकाणी स्प्रे करा. लसणाच्या उग्र वासामुळे त्या पुन्हा यायच्या नाहीत.
पहिल्यांदाच टॅटू काढण्यापूर्वी लक्षात ठेवा या ५ महत्त्वाच्या गोष्टी