Tap to Read ➤

टाचांच्या भेगांवर ८ घरगुती उपाय, पाय दिसतील सुंदर - वेदना कमी...

फुटलेल्या टाचांवरील भेगा कायमच्या दूर करण्यासाठी सोपे उपाय... भेगा जाऊन त्वचा होईल मऊ व मुलायम...
एक टब कोमट पाण्यांत १ कप मध घालून त्यात पाय बुडवून ठेवावे असे केल्याने पायांच्या भेगा लवकर बऱ्या होऊन आराम मिळतो.
रोज रात्री झोपताना कोमट खोबरेल तेलाने पायांच्या भेगांना मसाज केल्यास पायांच्या भेगा लवकर भरून निघतात.
कोमट पाण्यात लिंबाचा रस, ग्लिसरीन, गुलाब पाणी घालून या पाण्यांत १५ ते २० मिनिटे पाय बुडवून ठेवावे, यामुळे पायांच्या भेगा लवकर बऱ्या होण्यास मदत होते.
रोज थोडेसे ऑलिव्ह ऑईल गरम करुन पायांच्या भेगांना लावल्यास भेगा भरून, टाचांची त्वचा मऊ व मुलायम होण्यास मदत मिळते.
पिकलेले केळ मॅश करून त्यात मध घालून हे मिश्रण टाचांना लावावे यामुळे टाचांची त्वचा मॉइश्चराइज होऊन पुन्हा नव्यासारखी दिसू लागते.
ओट्सची पावडर करून त्यात खोबरेल तेल मिसळून हे मिश्रण पायांच्या भेगांवर लावावे यामुळे टाचांवरील डेड स्किन काढून टाकण्यास मदत होते.
रोज रात्री झोपताना पाय स्वच्छ करून ग्लिसरीन व गुलाबपाणी एकत्र करून पायांच्या भेगांना लावून पायात मोजे घालून झोपावे यामुळे आराम मिळतो.
पायांच्या भेगांमध्ये पेट्रोलियम जेली भरून हलक्या हातांनी मसाज करुन घ्यावा, यामुळे पायांच्या भेगा लवकर भरण्यास मदत होते.
क्लिक करा