Tap to Read ➤

बागेश्वर धाममध्ये कसा मिळतो प्रवेश? प्रक्रिया पाहून व्हाल थक्क

बागेश्वर धाममध्ये प्रवेश घेण्यासाठी भक्तांना मोठ्या प्रोससमधून जावे लागते.
बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा अचानक चर्चेत आले आहेत.
अंनिसचे श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्रींना आव्हान दिले. धीरेंद्र शास्त्रींनी ते स्वीकारले. यानंतर यासंदर्भातील वाद चिघळला.
धीरेंद्र शास्त्रींच्या या बागेश्वर धाममध्ये नेमका प्रवेश कसा मिळतो, त्याची प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊया...
ज्यांना बागेश्वर धाममधील प्रवचनामध्ये सहभागी व्हायचे आहे, त्या प्रत्येकाला टोकन दिले जाते.
भक्तांना हे टोकन विशिष्ट तारखेला बागेश्वर धामच्या पेटीत टाकावे लागते.
या टोकनसह एक फॉर्म भरुन द्यावा लागतो. त्यात आपले नाव, वडिलांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर द्यावा लागतो.
ज्या व्यक्तीचा नंबर लागतो, त्याला बागेश्वर धामकडून संपर्क केला जातो. उपस्थित राहण्याची तारीख दिली जाते.
त्याच दिवशी बागेश्वर धाममध्ये हजेरी लावावी लागते. हजेरी लावताना भक्तांना तीनपैकी एका रंगाच्या कपड्यामध्ये नारळ बांधून टाकावा लागतो.
सामान्य भक्तांना लाल रंगाच्या कापडात नारळ बांधून टाकावा लागतो. भूतबाधा झाल्यास काळ्या रंगाच्या कापडात नारळ बांधून टाकावा लागतो.
जर विवाहप्रश्नी समस्या असतील तर पिवळ्या रंगाच्या कापडात नारळ बांधून टाकावा लागतो.
उपस्थितांपैकी मोजक्या भक्तांनाच मंचावर येऊन समस्या मांडण्याची संधी मिळते.
बागेश्वर धामचे लोक भक्तांना फोनवरुन संपर्क साधतात. त्यांनाच मंचावर उपस्थित राहण्याची मुभा मिळते .
कोण आहेत बागेश्वर बाबा? चमत्काराचं आव्हान स्वीकारलं अन् दिव्यदृष्टीने मनातलं ओळखतात!
वाचा, संपूर्ण लेख...
क्लिक करा