थंडीत कपडे लवकर वाळण्यासाठी वापरा या ट्रिक्स

हिवाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत. यामुळे त्यांना कुबट वास येतो.

काही जणींना कपडे धुतल्यावर ते तसेच नळावर निथळत ठेवायची सवय असते. परंतु, तसं करु नका. कपडे धुतल्यानंतर ते लगेचच घट्ट पिळून घ्या. 

जर तुमच्या दाराशी सकाळी लवकर ऊन येत नसेल तर पंख्याखाली कपडे वाळवा. त्यानंतर दुपारच्या कडक ऊन्हात ते वाळायला टाका. पंख्याखाली वाळवल्यामुळे त्याच्यातील आर्द्रता बहुतांशी कमी होईल. व ते लवकर वाळतील.

रात्री शक्यतो कपडे बाहेर ठेऊ नका. वातावरणातील गारव्यामुळे कपडे गार पडतात. काही वेळा त्यांच्यावर दव देखील पडतं. ज्यामुळे ते ओलसर राहतात.

कपडे कधीही प्लास्टिकच्या दोरीवरच वाळत घाला. लोखंड किंवा अन्य धातुच्या दोरीवर ओलावा टिकून राहतो. ज्यामुळे कपडे आतल्या बाजूने ओलेच राहतात.

देशातील या ठिकाणी आहे चक्क श्वानांचं मंदिर!

Click Here