आता मेनिक्यूर करा घरीच ! मोजकं साहित्यात वापरुन मिळवा पार्लरची फिलिंग

अनेकजणी पार्लरमध्ये जाऊन महागड मेनिक्यूर करतात. परंतु, आता घरच्या घरी स्वस्तात करा मेनिक्यूर 

सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे प्रत्येक जण सुंदर दिसण्यासाठी महागडे सौंदर्यप्रसाधने वा पार्लरचा आधार घेत असतो.

सुंदर दिसण्यासाठी केवळ चेहरा सुंदर दिसून चालत नाही तर हात आणि पायांचं सौंदर्यही तितकंच छान जपणं गरजेचं आहे.

अनेकजणी पार्लरमध्ये जाऊन महागड मेनिक्यूर करतात. परंतु, आता घरच्या घरी स्वस्तात मेनिक्यूर कसं करायचं ते पाहुयात.

बेसन पीठात मध मिक्स करुन हा लेप तुम्ही हाताला लावा. त्यानंतर खोबऱ्याच्या तेलाने हलक्या हाताने ते स्क्रब करा. यामुळे हातांवरील मृत त्वचा निघून जाते.

लिंबाचा रस आणि साखर मिक्स करुन हे मिश्रण हाताला लावा. त्यानंतर १० मिनिटांनी हात धुवा.

हात धुतल्यावर खोबऱ्याच्या तेलाने हाताला मालिश करा.

किचन नॅपकिनला कुबट घाण वास येतोय? 'या' टेक्निकने करा दुर्गंधीची समस्या दूर

Click Here