एकाच नॅपकिनला हात पुसल्यामुळे त्याला कुबट वास येऊ लागतो.
किचनमध्ये काम करत असतांना वारंवार नॅपकिन किंवा टॉवेलचा वापर केला जातो.
वारंवार एकाच नॅपकिनला हात पुसल्यामुळे त्याला कुबट, घाण वास येऊ लागतो.
या नॅपकिनला तेला-तुपाचे, तिखटाचे डागही पडले असतात. त्यामुळेच हे डाग आणि त्यातून येणारा उग्र वास कसा घालवायचा ते पाहुयात.
नॅपकिनला घाण वास येत असेल तर गरम पाण्यात ते धुवा आणि कडक उन्हात वाळवा.
किचन टॉवेल वा नॅपकिन १५ मिनिटे व्हिनेगरमध्ये भिजवून ठेवा आणि त्यानंतर धुवा.
किचन टॉवेलवर खूपच गडद डाग आणि उग्र वास येत असेल तर, अर्धा कप बेकिंग सोडा आणि वॉशिंग पावडर मिक्स करा. आणि, त्याच्या सहाय्याने नॅपकिन धुवा.