Tap to Read ➤

तांब्याची बाटली चमकवण्यासाठी सोपी ट्रिक

ही सोपी ट्रिक वापरली तर बाटली नव्यासारखी चमकू लागेल.
तांब्याच्या बाटलीत पाणी पिण्याचे फायदे अनेकांना माहित आहे. बाटली फक्त दिसायला आकर्षित नसून त्याच्या पाण्याचे अनेक आरोग्याला फायदे होतात.
तांब्याच्या बाटलीत पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
तांब्याची बाटली साफ करणे अधिक कठीण होते. त्यावर पाण्याचे डाग तसेच राहातात. पण ही सोपी ट्रिक वापरली तर बाटली नव्यासारखी चमकू लागेल.
व्हिनेगर आणि मैदा वापरुन बाटलीवरील काळे डाग आणि बॅक्टेरिया सहज साफ होतात.
त्यासाठी थोडे पीठ घेऊन त्यात व्हिनेगर घाला आणि मिश्रण तयार करा. नंतर हे मिश्रण बाटलीवर चांगले घासून घ्या.
काही वेळ तसेच ठेवल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. ही टिप्स वापरल्याने तांब्याची बाटली पूर्णपणे स्वच्छ आणि चमकदार होईल.
अनेकदा तांब्याच्या बाटलीत घाण साचते. पाण्यामुळे ती आतून अधिक चिकट होते. अशावेळी बेकिंग सोड्याच्या मदतीने आपण ती स्वच्छ करु शकतो. यासाठी बाटलीमध्ये बेकिंग सोडा आणि गरम पाणी घालून, बाटली चांगली घासून घ्या.
तांब्याच्या बाटलीत लिंबू, व्हिनेगर आणि बेकिंग सोडाच्या मिश्रणाने देखील स्वच्छ करता येते. यासाठी त्याची पेस्ट तयार करुन बाटलीच्या आतून घासून घ्या. नंतर ती धुवून वाळवा.
क्लिक करा