हेल्मेट स्वच्छ करण्याच्या ट्रीक्स आणि टिप्स आज पाहुयात.
बऱ्याचदा हेल्मेट सतत वापरल्यामुळे ते खराब होतं.त्याच्यावरील रंग निघतो किंवा ते जुनाट दिसायला लागतं.
महिन्यातून निदान २ वेळा तरी हेल्मेट धुतलं पाहिजे. हेल्मेटमध्ये घाम साचल्यामुळे केस गळणे, कोंडा होणे या समस्या निर्माण होतात.
वॉशिंग पावडर आणि शॅम्पू एकत्र पाण्यात मिक्स करा. या पाण्याने हेल्मेट धुवा आणि कडक उन्हात वाळवा.