चुकून कापले गेले Traffic E-Challan? असे लढा आणि रद्द करा...
अनेकदा आपली चुकीच नसते पण वाहतुकीचे नियम मोडले म्हणून चलन पाठविले जाते. पोलिसांना आजकाल हे सोपे झाले आहे.
वाहतुकीचे नियम पाळताना अनेकदा चुकून नियम तोडले जातात. अनेकदा इतरांमुळे तोडावे लागतात. मागून सारखे हाँकिंग करणे, पहिला नंबर असेल तर पुढे जाण्यासाठी बाजुला हो म्हणून सांगितले जाते.
अनेकदा आपली चुकीच नसते पण वाहतुकीचे नियम मोडले म्हणून चलन पाठविले जाते. पोलिसांना आजकाल हे सोपे झाले आहे. पण वाहनचालकांना काही पर्याय नसतो.
असे चुकीच्या पद्धतीने आलेले ई चलन रद्द करायचे तर काय करायचे? नको ते उपद्व्याप म्हणत आपण दीड-दोन हजाराचे चलन भरतो. पण ते रद्दही करता येते.
यासाठी तुम्ही अधिकृत वेब पोर्टलवर जा. तिथे तुमच्या राज्याच्या वाहतूक विभागाला सिलेक्ट करा. तिथे लॉगिन केल्यावर तुम्हाला डिस्प्युट फाईल करता येतो.
तुम्हाला जी चूक झालीय ती स्पष्ट करावी लागेल. ते चलन कसे चुकीचे आहे ते सांगावे लागेल. तुमचे वाहन नव्हते. नंबर प्लेट धुसर आहे किंवा अन्य काही असेल तर सांगावे लागेल.
जर तुमच्याकडे काही ठोस पुरावा असेल तर तो अपलोड करावा लागेल. यात जीपीएस ट्रॅकिंग आणि डॅशकॅम व्हिडीओ आदी जोडू शकता.
तुम्ही तक्रार केल्यानंतर तुम्हाला त्याची चौकशी करून नोटीस पाठविली जाते. जर तक्रार खरी आढळली तर ते चलन रद्द केले जाते.
हे रद्द झालेले चलन रिसिप्ट तुम्हाला पाठविली जाते. अनेकदा आरटीओकडे याची अपडेट नसते, यामुळे तुम्हाला पुढे कोर्टाची नोटीसही येऊ शकते. यावेळी ही रिसिप्ट रद्द केल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल.