श्रीमंत व्हायचेय? ही धोरणे ठेवा ध्यानात, नाहीतर कायम कंगालच रहाल...
श्रीमंत होण्यासाठी मोठा तीर मारायची गरज नाहीय... काही गोष्टी पाळाव्या लागतील...
प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे असते. लक्षाधीशच नव्हे, तर अब्जाधीश होण्याची स्वप्ने प्रत्येक जण पाहत असतो; पण फारच थोड्या लोकांना हा टप्पा गाठण्यात यश मिळते.
योग्य नियोजन आणि सातत्य याच्या बळावर श्रीमंतीचे शिखर गाठता येते. त्यासाठी आवश्यक सात महत्त्वपूर्ण धोरणांची आज आपण येथे माहिती घेऊ या.
बुद्धिमान गुंतवणूक
आपल्याजवळील पैसा शहाणपणाने शेअर बाजार, रिअल इस्टेट आणि अन्य पर्यायांत गुंतवणे आवश्यक आहे.
वित्तीय शिक्षण
वैयक्तिक वित्त आणि गुंतवणूक याबाबतीत स्वत:ला सतत शिक्षित करीत राहा. वित्तीय ज्ञान हे मजबूत साधन आहे.
काटकसर
आपल्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्च कमी असायला हवा. त्यासाठी काटकसर करायलाच हवी. त्यातून उरणारी रक्कम गुंतवा.
उत्पन्नांची अनेक साधने
उत्पन्नाची साधने वाढवा. जोडधंदा, फ्रिलान्सिंग, गुंतवणूक किंवा रिअल इस्टेट भाडे इत्यादी पर्याय आहेत.
दीर्घकालीन दृष्टिकोन
संपत्ती उभी करण्यास वेळ लागतो. हे वर्ष-दोन वर्षांचे काम नाही. त्यासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.
उद्योजकता :
अंगी उद्योजकता आणणे आवश्यक आहे. संधींचा शोध घ्या, नावीन्यपूर्ण उपाय शोधा आणि कठोर परिश्रम करा.
हे लक्षात ठेवा :
यशाचा एकच एक फॉर्म्युला नसतो. व्यक्तीनुसार यशाचे मार्ग बदलत असतात. येथे दिलेली धोरणे मौल्यवान आहेत. मात्र, यशस्वितेसाठी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक वित्तीय योजना आखाव्या लागतील.