सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली. रान्याकडून साडे चौदा किलो सोनं जप्त करण्यात आलं.
एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने पकडण्याची ही पहिलीच वेळ नाही. दुबईतून सोने खरेदी करून ते भारतात आणण्यासाठी मर्यादा घालण्यात आली आहे.
आखाती देशांतून सोन्याची तस्करी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची कमी किंमत. इथले सरकार सोन्यावर कर आकारत नाही. त्यामुळे त्याची किंमत कमी होते.
भारतात सोन्यावरील कर खूप जास्त आहे. त्यामुळे सोन्याची किंमत वास्तविक किमतीपेक्षा कितीतरी जास्त असते. त्यामुळे स्वस्त सोने खरेदी करून ते भारतात विकण्याचा प्रयत्न केला जातो.
भारतात सर्वाधिक सोने संयुक्त अरब अमिरातीमधून येते. यानंतर म्यानमार दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय काही आफ्रिकन देशांतूनही तस्कर सोने आणतात.
कोणताही पुरुष २० ग्रॅम आणि कोणतीही महिला ४० ग्रॅम सोने विदेशातून आणू शकते. ते सीमाशुल्कापासून मुक्त आहे. सीमाशुल्क विभागाने सोने आणण्यासाठी शुल्क ठरवलं आहे.
पुरुष ५० हजार रुपयांपेक्षा जास्त तर महिला ४० ग्रॅम वजनाचे एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणू शकत नाही. यावर ३८ टक्के कस्टम ड्युटी भरावी लागते.
१५ वर्षांखालील मुलांना ४० ग्रॅम सोने आणण्याची परवानगी आहे. पासपोर्ट कायदा १९६७ नुसार, भारतीय नागरिक सर्व प्रकारचे सोने (दागिने, अंगठ्या आणि नाणी) आणू शकतात.