जर तुमची फसवणूक झाली तर तुम्ही कुठे तक्रार करावी? जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
आपल्याकडे ऑनलाईन फसवणुकीची तक्रार देण्यासाठी अनेक मार्ग आहेत.
भारत सरकारने ऑनलाइन घोटाळे आणि सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांसाठी एक पोर्टल तयार केले आहे, याचे नाव 'नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल' असं आहे.
यासाठी तुम्हाला www.cybercrime.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
ऑनलाइन फसवणूक, हॅकिंग, डेटा चोरी, बनावट वेबसाइटबद्दल तुम्ही येथे तक्रारी नोंदवू शकता. हे पोर्टल २४×७ सक्रिय राहते आणि तुमची तक्रार संबंधित सायबर गुन्हे शाखेकडे पाठवते.
सायबर गुन्हे,आर्थिक फसवणूक, १९३० वर कॉल करून तक्रार करता येते. हा हेल्पलाइन क्रमांक राष्ट्रीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने सुरू केला आहे. यामध्ये राज्य पोलिसही मदत करतात.