Tap to Read ➤
दिवसभरात १ तास मौन पाळण्याचे १० फायदे, जरा गप्प बसून तर पाहा...
दिवसातील एक तास अळीमिळी गुपचिळी, अजिबात बोलू नका आणि बघा फायदे...
एका संशोधनानुसार, जर आपण दिवसभरात किमान एक तास शांत राहिलो तर आपला मेंदू रिचार्ज होतो आणि अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यास सक्षम होतो.
सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी एक वेळ ठरुवून त्या वेळेस शांत राहून ध्यान किंवा आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा.
एक तास शांत राहिल्याने तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी होते. यामुळे मन शांत होते तसेच रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा आपली विचार करण्याची, समजून घेण्याची व ऐकण्याची क्षमता वाढते त्याचबरोबर काहीतरी नवीन करण्याची सर्जनशीलता वाढते.
एका संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक दिवसभरात एक तास मौन पाळतात ते कठीण व तणावपूर्ण परिस्थितींना संयमी पद्धतीने सामोरे जाऊ शकतात.
काही तास मौन पाळणे आणि काही काळ स्वत:ला स्थिर ठेवणे तुम्हाला एक चांगला श्रोता बनवते.
जेव्हा आपण काही काळ शांत राहून स्वतःवर लक्ष केंद्रित करतो, मनाला बाह्य आवाजापासून दूर ठेवतो तेव्हा आपल्यात सकारात्मक विचार अधिक करण्याची क्षमता वाढते.
दिवसभरातील काही काळ शांत बसणे हा एक प्रकारे मेंदूचा व्यायाम आहे त्यामुळे मेंदूचे स्नायू निरोगी राहतात.
रात्री झोपण्यापूर्वी एक तास शांत राहिल्याने रात्री गाढ व चांगली झोप येण्यास मदत होते.
हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग, डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी दिवभरातील एक तास शांत ध्यान लावून बसावे.
क्लिक करा