Tap to Read ➤

'तो' तिच्यासाठी बिझनेसमॅनशी भिडला, 'ती' त्याच्यासाठी ट्विटरवर भांडली!

क्रिकेटरच्या सातासमुद्रापार प्रेमाची गजब लव्हस्टोरी..
क्रिकेटपटूंच्या प्रेम कहाण्या ऐकायला-वाचायला फॅन्सना कायमच आनंद वाटत असतो. अनेक क्रिकेटपटूंच्या लव्ह स्टोरीमध्ये रोमान्ससोबतच ड्रामाही असतो.
असाच एक क्रिकेटर थेट सातासमुद्रापार एका तरूणीच्या प्रेमात पडला. दोन वर्ष डेटिंग केल्यानंतर त्याने एका सुंदर तरूणीशी लग्न केले.
इतकंच नव्हे तर, तिच्यासाठी त्याने थेट स्टेडियममध्ये हजारो लोकांसमोर चक्क एका प्रसिद्ध बिझनेसमनशी देखील भिडला. तो खेळाडू म्हणजे शाकिब अल हसन.
साकिबची प्रेमकहाणी 2010 मध्ये सुरू झाली. इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळताना त्याची उम्मे अहमद शिशीर हिच्याशी भेट झाली.
शिशीर मूळची बांगलादेशची, पण ती अमेरिकेत शिफ्ट झाली होती. शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असताना दोघे योगायोगाने एकाच हॉटेलमध्ये भेटले, मग पुढे मैत्री झाली अन् मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
लग्नानंतर, २०१४ मध्ये साकिबच्या पत्नीचे नाव सर्वाधिक चर्चेत आले होते. मीरपूरमध्ये सामना सुरू असताना एका बड्या बिझनेसमनने शिशीरसोबत गैरवर्तन केले.
आपल्या पत्नीशी असं वागल्याचं कळताच साकिब थेट स्टेडियममध्ये जाऊन रहमान नावाच्या व्यावसायिकाला बेदम मारहाण केली.
सध्या साकिब क्रिकेटमध्ये व्यस्त असतो. तर शिशीर देखील जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर बांगलादेशातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नाव कमावत आहे.
गेल्या वर्षी साकिबवर IPL ऑक्शनमध्ये कुणीही बोली लावली नाही, त्यावेळी शिशीर संतापली होती. 'संघांनी आधी फोन केले नि नंतर फसवलं', असा आरोप तिने केला होता.
या वेळी साकिबला KKRने विकत घेतलं पण बांगलादेश क्रिकेटने त्याला NOC न दिल्याने त्याला IPLमधून माघार घ्यावी लागलीय. त्यामुळे आता त्याची पत्नी पुन्हा चर्चेत आली आहे.
क्लिक करा