Tap to Read ➤

होळीचा रंग घालवण्याचे सोपे उपाय!

होळी खेळायला मजा येते पण आंघोळ करूनही जेव्हा रंग निघत नाहीत तेव्हा होते चिडचिड; त्यासाठीच या घरगुती टिप्स!
तुम्ही म्हणाल रंग खेळायला अजून सुरुवात केली नाही आणि तुम्ही रंग काढण्याचे उपाय सांगताय? म्हणतात ना, पूर्वतयारी कधीही चांगली!
रंग निघणार नाही या भीतीने सणाची मजा घालवू नका, बिनधास्त रंग खेळा, सोबतच रंग घालवण्याचे उपायही जाणून घ्या!
अनेक जण डेली स्किन केअर रुटीन फॉलो करतात, काही जणांना रंगांची ऍलर्जीही होते, त्यांनीही हे उपाय करायला हरकत नाही.
लिंबू आणि डाळीच्या पिठाचा अर्थात बेसनाचे मिश्रण करून चिवट रंग असलेल्या जागी चोळा, लगेच परिणाम दिसून येईल.
दही आणि गव्हाचे पीठ यांचे मिश्रणही रंग काढण्यासाठी प्रभावी ठरते.
होळी खेळायला जाण्याआधी नारळाच्या तेलाचा हात अंगावर फिरवून घ्या, तसेच रंग काढतानाही तेलाचा वापरा करा, लाभ होईल!
स्किन ऍलर्जी असणाऱ्यांनी होळी खेळायला जाण्याआधी आणि नंतर कोरफड जेली लावावी, रंग राहणार नाही.
केसातला रंग काढण्यासाठी दह्यामध्ये लिंबाचा रस कालवून ते मिश्रण केसाच्या मुळांना लावा, रंग निघून जाईल.
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून लावल्याने नखांमध्ये अडकलेला रंग निघून जाईल.
ग्लिसरीन आणि गुलाबजल एकत्र करून लावल्याने ओठ काळे पडणार नाहीत.
एवढ्या टिप्स मिळाल्यानंतर होळी खेळायला घाबरू नका, आनंदाच्या रंगात रंगून जा, मात्र तो रंग आयुष्यातून जाऊ देऊ नका!
क्लिक करा