ढेकूण दिसायला कितीही लहान असले तरीसुद्धा त्यांचा उपद्रव मोठा असतो.
रात्रभर झोपू न देणारा त्रासदायक कीटक म्हणजे ढेकूण. एकदा का या ढेकणांनी घरात प्रवेश केला की सहजासहजी ते बाहेर जात नाहीत.
बेड, लाकडी कपाट अशा सर्वत्र ठिकाणी दिसणाऱ्या ढेकणांचा नायनाय कसा करायचा याचे काही उपाय पाहुयात.
ढेकूण मारण्यासाठी लसूण प्रभावी उपाय आहे. लसणाच्या पाकळ्या ठेचून त्या पाण्यात मिक्स करा. हे लसणाचं पाणी ढेकूण झालेल्या ठिकाणी शिंपडा.
दालचिनी, आलं, काळीमिरी आणि लवंग पाण्यात मिक्स करुन हे पाणी उकळवा. त्यानंतर थंड झालेलं पाणी ढेकूण झालेल्या ठिकाणी स्प्रे करा.
पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करुन या पाण्याचा स्प्रे देखील ढेकूण मारण्यासाठी उपयुक्त ठरतो.
ढेकूण दूर ठेवण्यासाठी गादीला ऊन देणं फार महत्त्वाचं आहे. आठवड्यातून किमान २-३ वेळा गादी उन्हात ठेवा.