Tap to Read ➤
होळीच्या शुभेच्छांना 'असा' द्या पर्सनल टच!
फॉरवर्ड शुभेच्छा असतील तर कोणी रिप्लाय देत नाही, मात्र त्यात 'पर्सनल टच' असेल तर त्या आवडतात आणि लक्षातही राहतात!
सोडून देऊया जुने वाद, होळीच्या रंगांनी परस्परांना देऊ साथ
होळीच्या रंगांसारखे आयुष्य रंगीबेरंगी आहे, प्रेमरंगाशिवाय मात्र ते अपुरे आहे
आठवणींचे रंग, होळीच्या सणासारखे, साजरे करूया चिंब भिजलेल्या बालपणासारखे
होलिकेत करूया कटू आठवणींचे दहन, पुरण पोळीचा गोडवा आणून तृप्त करूया तन आणि मन
पुन्हा आवडेल पिचकारी, फुगे आणि रंग हाती घ्यायला, तुमच्यासारखे मित्र सोबत हवे यायला
रुसवा, फुगवा सोड, आज करून घे हवा तेवढा शिमगा, होळीनंतर फक्त जीवनगाणे आनंदाने गा
रोजच दाखवतेस/दाखवतोस तुझे खरे रंग, होळीच्या रंगात सगळ्यांबरोबर आपणही होऊया दंग
होळीची हवी सुट्टी, रोजच असतो कामात दंग, आज मनसोक्त खेळणार रंग, नकार देऊन करू नका अपेक्षाभंग
क्लिक करा