Tap to Read ➤
उन्हाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील १० बेस्ट पर्यटनस्थळे
या उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी राज्यातील १० बेस्ट पर्यटनस्थळाची यादी घेऊन आलो आहोत.
थंड हवेचे ठिकाणी महाबळेश्वर स्ट्रॉबेरी आणि नयनरम्य निसर्गासाठी प्रसिद्ध आहे.
मुंबई-पुण्यातील पर्यटकांसाठी माथेरानमधील हिरवीगार दृश्ये नक्कीच मोहित करतील.
पुणेकरांसाठी लोणावळ्यातील धबधबे आणि निसर्गरम्य दृश्ये नेहमीच पर्वणी असते.
या उन्हाळ्यात शांत आणि सुंदर ठिकाण पाहायचं असेल तर खंडाळा चांगला पर्याय आहे.
पाचगणीमध्ये तुम्ही टेबललँड आणि अमर्यादीत निसर्गाचा आनंद घेऊ शकता.
पश्चिम घाटातील आंबोली हे नयनरम्य ठिकाण आहे. तुमची चारचाकी असेल तर प्रवासाचा छान आनंद लुटता येईल.
भंडारदरा तलाव आणि डोंगरदऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात तुम्ही कॅम्पिंगही करू शकता.
जर गडकिल्ले पाहण्याची आवड असेल तर तोरणा किल्ला चांगला पर्याय आहे. ऐतिहासिक वारसा आणि निसर्ग अनुभवता येईल.
अलिबाग समुद्रकिनारा आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही वॉटर स्पोर्टही करू शकता.
स्वच्छ समुद्रकिनारे आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर डोळे झाकून कोकणात जा.
क्लिक करा