Tap to Read ➤

दहा हजारांचं डाऊनपेमेंट, घरी न्या नवी कोरी Hero Electric स्कूटर

पाहा महिन्याला किती भरावा लागेल ईएमआय? काय आहे खास
इलेक्ट्रीक स्कूटर सेगमेंटमध्ये हीरो इलेक्ट्रीकच्या वाहनांची उत्तम विक्री होते. सध्या अनेकांचा कल इलेक्ट्रीक वाहनांकडे वाढत आहे.
आज आम्ही Hero Electric च्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्स NYX आणि Optima स्कूटर्स कशा फायनॅन्स करू शकता हे पाहू.
तुम्ही फक्त 10,000 रुपये डाऊनपेमेंट देऊन हीरो इलेक्ट्रीक स्कूटर घरी नेऊ शकता. यानंतर उर्वरित रक्कम तुम्ही ईएमआय म्हणून भरू शकता.
हीरो इलेक्ट्रीक एनवायएक्स स्कूटरची किंमत 73590 रुपये एक्स शोरूम दिल्ली आहे. याच सर्वाधिक स्पीड 42 किमीचा असून ही 100 किमीपर्यंतची रेंज देते.
तर हीरो इलेक्ट्रीक ऑप्टिमाची एक्स शोरूम किंमत 67190 रुपयांपासून सुरू होते. त्याचा सर्वाधिक वेग 45 किमीचा असून ती 140 किमीपर्यंतची रेंज देते.
हीरो इलेक्ट्रीक एनवायएक्सची ऑनरोड किंमत 78176 रुपये आहे. जर तुम्ही 10 हजारांचं डाऊनपेमेंट केलं तर तुम्हाला 68176 रुपयांचं लोन घ्यावं लागेल.
3 वर्षांसाठी 8 टक्के व्याजदरानं 36 महिन्यांसाठी तुम्हाला 2200 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल.
हीरो ऑप्टीमा ड्युअल बॅटरी व्हेरिअंटची ऑनरोड किंमत 89038 रुपये आहे. तुम्ही 10 हजारांचं डाऊनपेमेंट केलं तर तुम्हाला 79038 रुपयांचं लोन घ्यावं लागेल.
3 वर्षांसाठी 9 टक्क्यांनुसार तुम्हाला महिन्याला 2513 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल.
टीप- हीरो इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करण्यापूर्वी शोरूममध्ये जाऊन फायनॅन्स डिटेल्स तपासणं आवश्यक आहे.
क्लिक करा