'बसून पाणी प्यायला वेळ कोणाकडे आहे?' असं म्हणत अनेकजण उभ्यानेच पाणी पितात.
'पाणी बसून प्या' असा सल्ला जुनीजाणती माणसं कायम देतात. परंतु, आजकाल सपशेल त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं.
'बसून पाणी प्यायला वेळ कोणाकडे आहे?' असं म्हणत अनेकजण उभ्यानेच पाणी पितात. परंतु, उभं राहून पाणी पिण्याचे काही दुष्परिणाम आहेत.
उभे राहून पाणी प्यायल्यामुळे त्याचा परिणाम शरीराच्या खालच्या भागात लवकर पोहोचते. त्यामुळे पचनक्रिया बिघडते.
ज्यांना किडनीसंबंधित तक्रारी आहेत त्यांनी उभं राहून पाणी पिऊ नये.उभं राहून पाणी प्यायल्यामुळे त्याचा परिणाम मूत्रपिंडावर होतो.
उभं राहून पाणी प्यायल्यामुळे पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे पचनसंस्थेवर दाब येतो.