कुंकू लावण्याचे काही शारीरिक फायदे सुद्धा आहेत.
भारतीय परंपरेमध्ये कुंकू लावण्याला फार महत्त्व आहे. विशेष म्हणजे कुंकू लावण्याचे काही शारीरिक फायदे सुद्धा आहेत.
कुंकू कायम दोन भुवयांच्या मध्ये किंवा केसांच्या भांगात लावलं जातं. ज्यामुळे डोकं शांत राहतं.
कुंकवामध्ये पाण्यासारखेही काही धातू वापरले असतात. ज्यामुळे ताणदेखील कमी होतो.
कपाळावर कुंकू लावल्यामुळे चेहऱ्यावर वेळेपूर्वी येणाऱ्या सुरकुत्या पडत नाहीत.
कुंकू लावल्यामुळे आपल्या आज्ञाचक्रावर दाब दिला जातो. त्यामुळे तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्याच्या स्नायूंना चांगला रक्तपुरवठा होतो.
आज्ञा चक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करत असते. जेव्हा आज्ञा चक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहण्यास मदत होते.