Tap to Read ➤

ताजीच कशाला? शिळी चपाती खाण्याचेही ७ फायदे

नेहमी ताजे अन्न खावे, शिळे खाऊ नये असा सल्ला दिला जातो. अनेक जण शिळे अन्न फेकून देतात. मात्र, चपाती फेकून देऊ नका. शिळ्या चपातीचे आश्चर्यकारक फायदे पाहा.
आपण आपल्या आजीकडून शिळ्या चपातीचे फायदे ऐकलेच असतील. आरोग्याला यातून अनेक फायदे मिळतात.
पोटाच्या निगडीत समस्या सोडवण्याचं काम शिळ्या चपात्या करतात. यासाठी थंड दुधासोबत चपाती खा.
मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी शिळी चपाती फायदेशीर ठरू शकते. सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम ऑप्शन.
शिळी चपाती खाणे रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. याने उच्च रक्तदाब सहज नियंत्रित करता येते.
शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्याचं काम शिळ्या चपात्या करतात. दुधासोबत आपण शिळी चपाती खाऊ शकता.
चपात्यांचे ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असते. त्यातील आरोग्यास उपयुक्त जीवाणू वाढतात. त्यामुळे शिळ्या चपाती खा.
शिळ्या चपात्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. जे खाल्ल्याने शरीराला उत्तम उर्जा मिळते.
शिळ्या चपात्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आढळते. त्यामुळे शरीराला प्रोटीन व अन्य पौष्टीक घटक मिळतात.
क्लिक करा