Tap to Read ➤

तुळस पार सुकून गेली? फक्त १ उपाय; पुन्हा येईल बहर, होईल हिरवीगार

आपल्याकडे तुळशीला केवळ धार्मिक, सांस्कृतिक नाही तर आरोग्यदृष्ट्याही अनन्य साधारण महत्त्व आहे.
धार्मिक महत्त्व असलेली ही तुळस न चुकता घराघरांत लावली जाते. अनेक ठिकाणी दररोज तुळशीची पूजाही केली जाते.
तुळशीचे औषधी गुणधर्मही अनेक आजारांवर रामबाण ठरू शकतात. तुळशीचे अनेक प्रकारही सांगितले गेले आहेत.
तुळशीला नियमितपणे पाणी घातले की वाढत राहते. इतर झाडांप्रमाणे तुळशीकडे फारसे लक्ष द्यावे लागत नाही.
कधी कधी तुळसही अचानक वाळून जायला लागते. एकदा तुळस वाळायला लागली की तिला पुन्हा बहर यायला वेळ लागतो.
सुकलेली तुळस पुन्हा बहरण्यासाठी काय करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी आज आपण एक सोपा उपाय आहे.
तुळस सुकली तरी ती लगेच परत येऊ शकते. हा उपाय फारसा खर्चिक आणि अवघड नसल्याने आपण घरच्या घरी अगदी सहज करु शकतो.
कडुलिंबाच्या पानांची पावडर हा तुळशीचे वाळलेले रोप पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. कडुलिंबाची पानं उन्हात वाळवून घ्यावीत.
ती सुकली की मिक्सरमधे वाटून घ्यावीत आणि केवळ दोन चमचे कडुलिंबाची पावडर तुळशीला घालावी. कुंडीतील माती १५ ते २० सेंटीमीटरपर्यंत उकरावी.
कडुलिंबाची पावडर त्यात घालावी. वरुन पुन्हा माती आहे तशी घालून टाकावी. नियमित पाणी घालावे. काही दिवसातच तुळशीला हिरवीगार पानं फुटलेली दिसतात.
३३ कोटी देव खरंच असतात का? काही अद्भूत तथ्ये अन् मान्यता 
वाचा संपूर्ण लेख
Created by potrace 1.15, written by Peter Selinger 2001-2017

सिनेमा, क्रिकेट, आरोग्य, बिझनेस, फॅशन, राजकारण यासह अन्य विषयांच्या माहितीपूर्ण अन् रंजक Web Stories पाहा!

क्लिक करा