Tap to Read ➤

हरमनप्रीतसह या 'चार-चौघीं'साठी शेवटची T20 World Cup स्पर्धा?

महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत या पाच जणींवर असतील सर्वांच्या नजरा
महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या नवव्या हंगामातील सामने युएईच्या मैदानात रंगणार आहेत.
यंदाची टी -२० वर्ल्ड कप स्पर्धा अनेक स्टार महिला खेळाडूंसाठी शेवटची ठरू शकते, इथं नजर टाकुयात त्या महिला खेळाडूंवर
भारतीय महिला संघाचे नेतृत्व करणारी हरमनप्रीत कौर सध्या ३५ वर्षांची आहे. आतापर्यंत ती सर्वच्या सर्व टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळली आहे. या भारतीय स्टार खेळाडूसाठी नववा हंगाम शेवटचा ठरू शकतो.
२०१६ च्या हंगामात वेस्ट इंडीजच्या महिला संघाला चॅम्पियन करणाऱ्या स्टेफनी टेलरसाठीही यंदाची टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा शेवटची ठरु शकते. ती आंतरराष्ट्रीय महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरपैकी एक आहे.
न्यूझीलंडची सोफी डिवाईन ही देखील २००९ पासून आतापर्यंत प्रत्येक टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसली आहे. ती ३५ वर्षांची असून पुढच्या वर्ल्ड कपसाठी ती संघाचा भाग असेल, असे वाटत नाही.
न्यूझीलंडच्या ताफ्यातील सुझी बेट्स ही देखील नवव्यांदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. पुढच्या हंगामात ती ३९ वर्षांची असेल. त्यामुळे तिचा टी-२० वर्ल्ड कपचा प्रवास युएईतच संपेल, असे वाटते.
ऑस्ट्रेलियन एलिसा पेरी ही ३३ वर्षांची आहे. ती ऑल राउंडरच्या रुपात ओळखली जाते. पण गुडघ्याच्या दुखापतीनंतर ती गोलंदाजीपासून दूर राहताना दिसली आहे. त्यामुळे तिचा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवासही अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येते.
क्लिक करा