सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरमध्ये स्मृतीशिवाय दोन भारतीय, पहा रेकॉर्ड
महिला आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कुणाच्या नावे आहे माहितीये का?
महिला प्रीमिअर लीग २०२५ स्पर्धेला १४ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. एक नजर टाकुयात आतापर्यंतच्या इतिहासात या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या ५ बॅटर्सवर
इंग्लंडची नताली साइवर-ब्रंट ही वुमन्स प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. दोन हंगामातील १९ सामन्यातील १९ सामन्यात नतालीनं ५०४ धावा केल्या आहेत.
भारताची स्टार हरमनप्रीत कौर महिला आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. दोन हंगामात तिने १७ सामन्यातील १६ डावात ५४९ धावा केल्या आहेत.
भारताची युवा बॅटर शफाली वर्मा सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिने २ हंगामातील १८ सामन्यातील १८ डावात ५६१ धावा केल्या आहेत.
एलिसा पेरीनं दोन हंगामातील १७ सामन्यातील १७ डावात ६६ धावा केल्या आहेत.
या यादीत मेग लेनिंग टॉपला आहे. दोन हंगामातील १८ सामन्यातील १८ डावात तिच्या खात्यात ६७६ धावांची नोंद आहे.