Tap to Read ➤

हरमनप्रीत कौरनं केली मिताली राजची बरोबरी, एक नजर खास रेकॉर्ड्सवर

महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या ५ बॅटर
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावत काही खास विक्रम आपल्या नावे केले आहेत.
टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या माजी कॅप्टन मिताली राजच्या रेकॉर्डशी तिने बरोबरी साधली आहे.
याशिवाय टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दोन अर्धशतक झळकवणारी हरमनप्रीत तिसही भारतीय बॅटर ठरली. याआधी मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी अशी कामगिरी केली होती.
एक नजर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या महिला खेळाडूंवर
हरमनप्रीत कौर हिने ७२६ धावांसह माजी कर्णधार मिताली राजच्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
मिताली राजनं २००६ ते २०१९ या कालावधीत महिला टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळलेल्या सामन्यात ७७६ धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत स्मृती मानधना ५२४ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मुंबईकर जेमिमा रॉ़ड्रिग्स हिने महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ४०७ धावा केल्या आहेत.
पूनम राउत ३७५ धावांसह या यादीत टॉप ५ भारतीय महिला खेळाडूंच्या यादीत असल्याचे दिसून .येत
क्लिक करा