केस गळणं कमी करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय, ५ फळं खा- केस वाढतील भराभर,
केसांना आहारातून योग्य पोषण नाही मिळालं तर केस गळतात. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी पोषक ठरणारी ही ५ फळं तुमच्या आहारात नियमितपणे घेत चला.
केळीमध्ये केसांसाठी पोषक ठरणारे नॅचरल ऑईल असते. ते केसांना योग्य प्रमाणात मिळाले तर केसांच्या अनेक समस्या कमी होतात.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे केस मुळांपासून मजबूत होण्यास फायदा मिळतो आणि केसगळती कमी होते.
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी तर भरपूर प्रमाणात असतेच. पण त्यासोबतच मँगनीज, मॅग्नेशियम, कॉपर हे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त् ठरणारे घटकही मोठ्या प्रमाणात असतात.
केसांच्या वाढीसाठी आवळा खूप उपयुक्त आहे. त्यामुळे आवळा नियमितपणे खावा.
पेरुमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पेरू खाल्ल्याने केसांची वाढ तर चांगली होतेच, पण डोक्यातला कोंडा कमी होण्यासही मदत होते.