Tap to Read ➤
गुरु प्रदोष शिवरात्रि: राशीनुसार ‘या’ गोष्टी अर्पण करा; अपार लाभ मिळवा
गुरु प्रदोष शिवरात्रि व्रतात राशीनुसार गोष्टी अर्पण करणे शुभ मानले गेले आहे.
गुरुवार, २७ मार्च २०२५ रोजी असलेल्या गुरु प्रदोष शिवरात्रि निमित्ताने आपण शिव उपासनेबरोबरच गुरु उपासना केली पाहिजे.
तुमची रास कोणती? राशीनुसार, काही गोष्टी अर्पण केल्यास महादेव तसेच दत्तगुरु, गुरु ग्रहाचे पाठबळ प्राप्त होऊ शकेल.
मेष: भगवान शंकराला चंदनाचे गंध लावावे आणि 'ओम नमः शिवाय' मंत्रजप १०८ वेळा करावा.
वृषभ: भगवान शंकराला दूध आणि पवित्र धागा अर्पण करावा. महादेवाचा श्लोक म्हणून तो धागा उजव्या मनगटाला बांधावा.
मिथुन: प्रदोष व्रताच्या दिवशी भोलेनाथांना बेलपत्र अर्पण करावे.
कर्क: प्रदोष व्रताला भगवान शंकराला बेल आणि पांढरी फुलं अर्पण करून शिवजप करावा.
सिंह: या तिथीला महादेवाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.
कन्या: भगवान शंकराला दूध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालावा.
तूळ: प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराला मध, पांढरे चंदन आणि बेलाचे पान अर्पण करावे.
वृश्चिक: भोलेनाथांना लाल धागा अर्पण करावा आणि प्रसाद रुपी आपल्या उजव्या मनगटावर बांधून घ्यावा.
धनु: भगवान शंकराला केशर मिश्रित जल अर्पण करावे.
मकर: शिवाला निळी फुले आणि शमीची पाने अर्पण करावीत.
कुंभ: भगवान शंकराला काळे तीळ अर्पण करावेत.
मीन: भोलेनाथांना नागकेसरचे फूल अर्पण करावे, ते न मिळाल्यास कोणतेही पांढरे फुल अर्पण करावे. - यांसदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला अधिक उपयुक्त ठरू शकेल.
क्लिक करा