मुलींना इंप्रेस करायचंय? मग मुलांनी नक्की फॉलो करा या ग्रुमिंग टिप्स

सुंदर दिसण्यासाठी मुलींकडे अनेक प्रकारचे सौंदर्यप्रसाधने असतात

सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यानुसार बाजारात काही ग्रुमिंग किट ही सहज उपलब्ध असतात.

सुंदर दिसण्यासाठी मुलींकडे अनेक प्रकारचे सौंदर्यप्रसाधने असतात. परंतु, मुलांनी स्वत:ला कसं ग्रुम करावं ते पाहुयात.

शरीराचा महत्त्वाचा भाग म्हणजे चेहरा.त्यामुळे वेळोवेळी फेशवॉशने चेहरा धुवत जा. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल, धूळ सहज स्वच्छ होते आणि तुम्ही कायम फ्रेश वाटता.

ड्रेसिंगसेन्स योग्य असणं गरजेचं आहे. योग्य मापाचे, रंगसंगतीचे कपडे घालणे गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्ही आकर्षक दिसता.

केस कायम व्यवस्थित विंचरलेले, नीट कापलेले असावेत. विस्कटलेले केस तुमच्या लूकमध्ये व्यत्यय आणू शकतात.

सध्या लांब दाढी ठेवण्याचा ट्रेंड आहे. जर तुम्हालाही लांब दाढी आवडत असेल तर ती वेल ग्रूम्ड बियर्ड असणं गरजेचं आहे. दाढीला योग्य कट, शेप दिल्यामुळे तुम्ही नक्कीच हॅण्डसम दिसू शकता.

आकर्षक दिसण्यासोबत बॉडी ओडर कंट्रोल करणंही गरजेचं आहे. दिवसभर धावपळ केल्यामुळे घामाचा वास येणं सहाजिकच आहे. त्यामुळे, न चुकता परफ्यूम लावणं गरजेचं आहे.

मुलींना एसीची हवा का सहन होत नाही? कारण वाचून वाटेल आश्चर्य 

Click Here