Tap to Read ➤

काय आहे किसान विकास पत्र? ज्यात दुप्पट होतो तुमचा पैसा

सर्व पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये ही स्कीम उपलब्ध आहे.
पोस्टाकडून अशा काही स्कीम्स चालवल्या जातात ज्याच्या माध्यमातून गुंतवणूकदार सुरक्षित आणि हमखास रिटर्न मिळवू शकतात.
यापैकीच असलेल्या एका स्कीममधून काही महिन्यांत गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट होऊ शकतो.
किसान विकास पत्र भारत सरकारकडून चालवली जाणारी एकरकमी गुंतवणूक योजना आहे. यामध्ये एका निश्चित कालावधीत तुम्ही तुमचा पैसा दुप्पट करू शकता.
सर्व पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये ही स्कीम उपलब्ध आहे. प्रामुख्यानं याची सुरुवात शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे, जेणेकरून ते दीर्घकाळासाठी बचत करू शकतील.
१ एप्रिलपासून याच्या व्याजदरात वाढ करण्यात आलीये. यामध्ये सध्या ७.१ टक्के दरानं व्याज दिलं जातंय.
या स्कीममध्ये पैसे दुप्पट होण्यासाठी १२० महिन्यांचा कालावधी लागत होता. परंतु आता ११५ महिन्यांमध्येच पैसे दुप्पट होतात.
जर तुम्ही एकरकमी ४ लाखांची गुंतवणूक केली तर ११५ महिन्यांमध्ये तुम्हाला ८ लाख मिळतात. यामध्ये चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो.
किसान विकास पत्रामध्ये १००० रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. नंतर १०० रुपयांच्या पटीत गुंतवणूक केली जाऊ शकते. यात कितीही खाती उघडता येतात.
क्लिक करा