Tap to Read ➤

का वाढतोय सोन्याचा दर, जाणार का ₹७५००० पार?

सध्या सोन्याचे दर दररोज नवनवे रकॉर्ड प्रस्थापित करत आहे.
सध्या सोन्याचे दर दररोज नवनवे रकॉर्ड प्रस्थापित करत आहे. पाहूया यामागील कारण नेमकं आहे काय?
सोन्याच्या किंमती आता ७१ हजारांपार केली आहे. एमसीएक्सवर सोन्याची किंमत ७१,२४९ रुपये प्रति १० ग्राम झालीये. आता ही किंमत ७५ हजार पार जाणार हे पाहावं लागणारे.
दरम्यान चांदीही यात मागे नाही. एमसीएक्सवर चांदीचे दर ८२,२९० रुपये प्रति किलो पर्यंत झाली आहे.
भारतापासून अमेरिकेपर्यंत एका वर्षात अनेक देशांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. अशात जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता आहे. याचा परिणामही सोन्यावर दिसत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये अद्यापही युद्ध सुरू आहे. यामुळेही सोन्यात गुंतवणूक वाढत आहे. अशातच सोनं हे सेफ हेवन असेट मानलं जातं.
फेडरल रिझर्व्हनं व्याज दरात ३ टक्के कपातीची शक्यता व्यक्त केलीये. परंतु २ टक्के होण्याची शक्यता दिसत आहे. यासाठीच सोन्याकडे अनेकांचा कल वाढत आहे.
क्लिक करा