Tap to Read ➤

Gold-Silver Rate : सोनं पुन्हा चमकलं, चांदीही महागली; पाहा लेटेस्ट दर

सणासुदीच्या काळात आता पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, सोनं आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) वाढ दिसून आली. देशांतर्गत सोन्याच्या वायदा किमती सुरुवातीच्या व्यापारात वाढीसह व्यवहार करताना दिसत आहेत.
एमसीएक्स एक्स्चेंजवर, 5 ऑक्टोबर 2023 रोजी डिलिव्हरीसाठी सोनं सोमवारी सकाळी 0.18 टक्क्यांनी किंवा 107 रुपयांच्या वाढीसह 59,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसले.
त्याचबरोबर चांदीच्या दरातही तेजी दिसून आली. जागतिक बाजाराबद्दल बोलायचे झाले तर सोमवारी सकाळी सोने आणि चांदी दोन्ही वाढीसह व्यवहार करताना होते.
सोमवारी सकाळी, एमसीएक्सवर, 5 डिसेंबर 2023 रोजी डिलिव्हरीसाठी चांदी 0.30 टक्क्यांनी किंवा 219 रुपयांनी 72,373 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती.
सोमवारी सकाळी जागतिक सोन्याच्या दरात वाढ झाली. कॉमेक्सवर सोन्याचा जागता वायदा दर 0.19 टक्के किंवा 3.70 डॉलर्सच्या वाढीसह 1949.90 डॉलर्स प्रति औंसवर व्यवहार करत होता.
सोन्याबरोबरच चांदीच्या जागतिक किमतीतही सोमवारी सकाळी वाढ झाली. कॉमेक्सवर, चांदीचा वायदा दर 0.15 टक्के किंवा 0.03 डॉलर्सच्या वाढीसह 23.42 डॉलर्स प्रति औंसवर व्यवहार करताना दिसले.
त्याच वेळी, चांदीची जागतिक स्पॉट किंमत 0.48 टक्के किंवा 0.11 डॉलरच्या वाढीसह 23.15 डॉलर्स प्रति औंसवर व्यवहार करताना दिसून आली.
क्लिक करा