Tap to Read ➤

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणार असाल तर लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
जर तुम्ही धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सोनं खरेदी करण्यापूर्वी या ५ गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.
सोनं खरेदी करण्यापूर्वी ते किती शुद्ध आहे ते पाहिलं पाहिजे. २४ कॅरेट सोनं सर्वात शुद्ध मानलं जातं. याशिवाय २२ कॅरेट सोनंही खरेदी केलं जातं. त्यावर हॉलमार्क आहे का नाही हे तपासा.
ज्या दिवशी सोनं घेणार असाल त्या दिवसाचा सोन्याचा दर तपासा. त्यानंतर त्याच्या वजनानुसार त्याची किंमत किती असेल याचा अंदाज घ्या.
केवळ धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं शुभ असतं म्हणून सोनं खरेदी करू नका. तुम्ही सेव्हिंगनुसार सोन्यात गुंतवणूक करा. तुम्ही सोन्याचं कॉईन खरेदी करू शकता.
सोनं खरेदी करताना, तुम्ही ज्वेलरच्या रिटर्न आणि एक्सचेंज पॉलिसीवर लक्ष द्या. रिसेल करावं लागल्यास पॉलिसी काय असेल ते जाणून घ्या.
सोनं खरेदी केल्यास ते सुरक्षित ठेवणंही महत्त्वाचं आहे. त्याचीही सोय करणं तितकंच आवश्यक आहे.
क्लिक करा